बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द
बातमी विदेश

बोरिस जॉन्सन यांचा प्रजासत्ताक दिनाचा दौरा रद्द

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. त्यातच कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा स्वीकारले होते. मात्र ब्रिटनमधील कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव पाहता त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. “बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली. महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली” असे डाऊनिंग स्ट्रीटवरील प्रवक्त्याने सांगितले.

व्हायरसमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी यूकेमध्येच थांबणे आवश्यक आहे” असे जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. “कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या एका आठवड्यात ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत एक तृतीयांशने वाढ होऊन ती जवळपास 27 हजार इतकी झाली आहे. ही संख्या एप्रिल महिन्यातील रुग्णसंख्येच्या 40 टक्के जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनने भारतातही शिरकाव केला असून भारतात आतापर्यंत 38 रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची सुरवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली.