गेम खेळू न दिल्याने मुलाकडून वडिलांची गळा दाबून हत्या
देश बातमी

गेम खेळू न दिल्याने मुलाकडून वडिलांची गळा दाबून हत्या

नवी दिल्ली : एका १७ वर्षीय मुलाने मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना याच गुजरातमधील सुरत येथे घडली आहे. घटनेनंतर त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही घटना सुरत शहरातील इच्छापोर पोलीस ठाणे हद्दीतील कवास गावात राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडली आहे. हा व्यक्ती पत्नी व मुलासह राहत होते. दरम्यान मंगळवारी त्याला त्याच्या पत्नी व मुलाने बेशुद्ध अवस्थेत सूरतच्या शासकीय रुग्णाल आणलं होतं. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या व्यक्तीच्या पत्नीने व मुलाने सुरूवातीला डॉक्टरांना सांगितलं की, आठ दिवस अगोदर हा व्यक्ती बाथरूममध्ये पडली होती. तेव्हा त्याला दुखापत झाली होती. मंगळवारी ते झोपले आणि उठलेच नाही. मात्र त्यांनी दिलेली माहिती डॉक्टारांनी संशास्पद वाटल्याने, त्यांनी या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झाले की, या व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे. त्यावर डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी आपल्या पद्धतीने मुलाची व पत्नीची विचारपूस केली असता, त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. मी कायम मोबाईलवर गेम खेळत असल्याने माझे वडील मला नेहमी रागावायचे, त्यामळे मंगळवारी जेव्हा ते झोपले होते तेव्हा मी त्यांचा गळा दाबला, असं १७ वर्षीय मुलने पोलिसांसमोर कबूल केलं. यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नी व मुलास ताब्यात घेतलं व पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे.