आजपासून राज्यातील चार जिल्ह्यात ड्रायरनला सुरवात; असे आहेत ड्रायरन’चे टप्पे
कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

आजपासून राज्यातील चार जिल्ह्यात ड्रायरनला सुरवात; असे आहेत ड्रायरन’चे टप्पे

जालना : कोरोना लसीकरणासाठी राज्यसरकर सज्ज झाले असून आजपासून राज्यात लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. तसेच, पुण्यातील सिरम इनस्टीटयूट तयार केलेली लस देण्यासाठी राज्य तयार असून त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालन्यातील ड्राय रन सुरू असलेल्या केंद्राची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले असता त्यांनी याबाबत माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुण्यातील तीन केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. औंध जिल्हा रुग्णालय, मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना टोपे म्हणाले की, ड्रायरन मध्ये लसीकारणाचे तीन टप्पे आहेत.

पहिला टप्पा
लसीकरण केंद्राची रचना मतदान केंद्रासारखीच असेल. ‘आपण मतदान करण्यासाठी केंद्रावर जातो, त्यावेळी तिथे आपली पहिली भेट पोलीस कर्मचाऱ्यांशी होते. लसीकरण केंद्रावरदेखील पोलीस असतील. ते ओळखपत्र तपासतील. लसीकरण केंद्रात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असेल. त्याशिवाय केंद्रात प्रवेश करता येणार नाही.

दुसऱ्या टप्पा
पोलिसांना ओळखपत्र दाखवल्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंडिफिकेशन रुममध्ये जाईल. तिथे शिक्षक किंवा शिक्षिका असतील. ज्यांना लसीकरणासाठी मेसेज पाठवण्यात आला आहे, तीच व्यक्ती केंद्रावर आली आहे का, याची पडताळणी कोविन ऍपच्या माध्यमातून केली जाईल.

तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात पडताळणी झाल्यानंतर लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन किंवा तीन प्रशिक्षित नर्स असतील. त्या ठराविक तापमानात ठेवण्यात आलेली लस संबंधित व्यक्तीच्या दंडाला टोचतील.

चौथा टप्पा
तथापि, लस टोचल्यानंतर व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. जर काही व्यक्तींना ताण-तणावाची समस्या असेल किवा त्याला अस्वस्थ वाटत असेल किंवा त्याला भोवळ आल्यास लसीकरण केंद्रावर बेड, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा उपलब्ध असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीचं निरीक्षण करण्याचं काम आशा वर्कर्स, अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला करतील.

मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर बिनधास्त फिरता येईल, असा अनेकांचा समज झालेला आहे. कोरोनाची लस घेतली की निर्धास्तपणे फिरायला मोकळे, असं अनेकांना वाटू लागलं आहे. लस मिळाली म्हणजे कोरोना होणार नाही असे नाही. कोरोना अजूनही गेला नाही. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, कोरोनाची लस घेतल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळणं गरजेचं आहे, असं टोपे म्हणाले.