प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यंदाचे प्रमुख पाहुणे
देश बातमी

प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यंदाचे प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली : येत्या 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. राब म्हणाले, की “आमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.” दरम्यान यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तब्बल 27 वर्षानंतर ब्रिटीश पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी जॉन मेजर हे 1993 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते.

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब भारत दौर्‍यावर आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची आज भेट घेतली. यानंतर एस. जयशंकर म्हणाले की, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांमधील एका नव्या युगाचं प्रतीक असेल. आम्हाला भारताशी आर्थिक संबंध बळकट करायचे आहेत. दहशतवाद आणि कट्टरतावादामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर चर्चा करायची आहे. असेही त्यांनी नमूद केले.