आरोग्य विभाग भरती 2021 जाहीर: ‘या’ दिवशी होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभाग भरती 2021 जाहीर: ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांपैकी 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येतंय. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील. सदर प्रसिध्द झालेल्या जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात, फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे आरोग्य विभागाची जी जवळपास दहा हजार पदे आहेत ती आणि आरोग्य खात्याची स्वत: ची सात हजार पदे अशी एकूण सतरा हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी आता 50 टक्के पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3341 जागा रिक्त आहेत.

आरोग्य विभागाची भरतीची जाहिरात
स्वतंत्रपणे विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य सेवेतील ५० टक्के रिक्त पदांवरील पद भरती प्रक्रियेस मान्यता दिली असल्याने www.mahapariksha.gov.in व www.arogya.| maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर नियुक्ती प्राधिकारीनिहाय रिक्त पदांचा तपशील प्रसिद्धसदर प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखून ठेवण्यात पदभरतीबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रह झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

दरम्यान, कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. पद भरती तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पद भरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील.