झूम कॉलचा कॅमेरा ऑन झाला अन् खासदार चक्क दिसले नग्नावस्थेत
बातमी विदेश

झूम कॉलचा कॅमेरा ऑन झाला अन् खासदार चक्क दिसले नग्नावस्थेत

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागल्यापासून संपूर्ण जगाने वर्क फ्रॉम होमचा स्वीकार केला. एरव्ही बंद खोलीत होणाऱ्या बैठका ऑनलाइन होऊ लागल्या. अशाच एका कॅनडातील बैठकीत एक प्रकार घडला असून तेथील एका खासदाराला लाजिरवाण्या प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. व्हिडीओ मीटिंगदरम्यान चुकून लॅपटॉपचा कॅमेरा ऑन झाल्याने कॅनडाचे खासदार विल्यिअम एम्स चक्क नग्नावस्थेत दिसले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संसदेतील सदस्यांसोबत असणाऱ्या झूम कॉलवर विल्यिअम एम्स सहभागी होणार होते. यावेळी विल्यिअम एम्स सदस्स्यांना संबोधित करणार होते. मात्र बैठकीआधीच लॅपटॉपचा कॅमेरा ऑन झाला आणि विल्यिअम एम्स नग्नावस्थेत दिसल्याने इतर सदस्यांना धक्का बसला. हे फीड फक्त कॅनेडियन संसदेच्या फीडवर प्रसारित करण्यात आल्याने सुदैवाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं नाही.

ही घटना सार्वजनिक झाल्यानंतर विल्यिअम यांनी नंतर ट्विट करत याप्रकरणी माफीदेखील मागितली. मी आज खूप मोठी चूक केली आणि नक्कीच त्यामुळे मला लाज वाटतीये, असं विल्यिअम यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, मी जॉगिंगवरुन आल्यानंतर ऑफिसचे कपडे घालत असताना कॅमेरा चुकून चालू राहिला. सभागृहातील माझ्या सर्व सहकाऱ्यांची मी माफी मागतो. हे चुकून झालं असून यापुढे होणार नाही.