काँग्रेस आमदारांच्या निधनाच्या सोशल मीडियावर पोस्ट; सुप्रिया सुळेंनीही केले ट्विट डिलीट
बातमी मराठवाडा

काँग्रेस आमदारांच्या निधनाच्या सोशल मीडियावर पोस्ट; सुप्रिया सुळेंनीही केले ट्विट डिलीट

देगलूर : कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत असून देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष) यांचे आज मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले असल्याचे सांगून नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या निधनाची बातमी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकजण केलेल्या पोस्ट डिलीट करत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखिल श्रद्धांजलीचे ट्विट केले होते. परंतु, त्यानंतर ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे. काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख यांनीही सोशल मीडियावर निधनाची केलेली पोस्ट डिलीट केली आहे.

आमदार अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित झाले होते. तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नांदेड येथील भगवती रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे अॅडमिट केले होते. मागील 8 दिवसापासून ते अत्यवस्थ होते.