मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
देश बातमी

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

इंदोर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती खालावली असून त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आला होता, त्यानंतर ते बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांच्यावर डॉक्टरांचा देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदोर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी, अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला होता. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्या प्रकृतीबाबत फोन करून चौकशी केली होती.

करोना काळात कमलनाथ सक्रिय आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रात अनेक मंत्रालयाचा पदभार सांभाळलेले कमलनाथ २०१८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर एका वर्षातच कॉंग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले.