अल्लू-अर्जुन अन् रश्मिकाचा सत्यघटनेवर आधारित पुष्पाचा टिझर रिलीज
मनोरंजन

अल्लू-अर्जुन अन् रश्मिकाचा सत्यघटनेवर आधारित पुष्पाचा टिझर रिलीज

चेन्नई : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा काल अल्लू अर्जुनचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा या त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरची चर्चा सर्वत्र सुरू असून हा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टीझरमध्ये अल्लु अर्जुन एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अल्लू अर्जुन हा नेहमीच वेगवेगळी भूमिका साकारताना दिसतो. पुष्पाचा टीझर प्रदर्शित होताच, त्याच्या चाहत्यांनी शेअर करत त्यावर रिअॅक्शन्स दिल्या आहेत. त्यांच्या कमेंट वाचून ते सगळे त्याच्या चित्रपटाची किती आतुरतेने वाट पाहत आहेत, याची कल्पना ही लगेच येते.

अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट पुष्पा हा आंध्र प्रदेशच्या डोंगरांमध्ये सुरू असलेल्या लाल चंदनाची तस्करी आणि खऱ्या घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षक पहिल्यांदाच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदनाला मोठ्या प्रडद्यावर एकत्र पाहणार आहेत. हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.