साधारणपणे एक मास्क कधीपर्यंत वापरावा?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

साधारणपणे एक मास्क कधीपर्यंत वापरावा?

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकाधिक लोकांना संक्रमित करत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी फार आधीपासूनच आरोग्य खातं आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मास्कच्या वापरावर सातत्याने भर देण्यात येत आहे. पण, एक मास्क कधीपर्यंत वापरायला हवा हे तुम्हाला माहित आहे का?

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सार्वजनिक ठिकाणांवर कोरोनापासून बचावासाठी सर्जिकल आणि कापडापासून तयार करण्यात आलेला मास्क सर्वाधिक फायद्याचा समजला जातो. जुना किंवा वारंवार एकच मास्क वापरणं हे हानिकारक असल्यामुळं मास्क सातत्यानं बदलणं महत्त्वाचं आहे. सध्या वैद्यकिय सल्ल्यानुसार तीन लेअर असणारा मास्क वापरणं फायद्याचं आहे. ज्यामध्ये श्वासोच्छवासास त्रास होणार नाही अशा कापडाचा वापर केलेला असतो. हे मास्क वारंवार वापरले जाऊ शकतात आणि खिशालाही परवडतात.

कापड आणि सर्जिकल मास्क वापरुन वारंवार धुतल्यानंतर कापड पातळ होतं किंवा मास्क फाटतं. त्यामुळं यापासून कोरोना संसर्गाचा धोका अधिक बळावतो. तुम्हीही अधिक काळापासून एकच मास्क वारंवार धुवून त्याचाच वापर दैनंदिन जीवनात करत असाल तर, हे धोक्याचं ठरु शकतं. त्यामुळं अगदी लहान गोष्टींमधील बारकावे लक्षात घ्या आणि कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवा.