उद्यापासून सुरु कोरोना लसीकरणाची तालीम; महाराष्ट्रातील ‘या’ ४ जिल्ह्यांची निवड
कोरोना इम्पॅक्ट बातमी

उद्यापासून सुरु कोरोना लसीकरणाची तालीम; महाराष्ट्रातील ‘या’ ४ जिल्ह्यांची निवड

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून संपूर्ण जगच चिंतेत वावरत होते. पंरतु आता एक दिलासादायक बातमी समोर आली असून लसीकरणाची गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेली तयारी पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील सर्वच राज्य आणि सर्व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये उद्या म्हणजेच शनिवारपासून कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालीमीला सुरवाक होतेय. त्यासाठी महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष लस दिली जाणार नसली तरी लसीकरणावेळी करावी लागणारी सर्व सिद्धता करण्यात येणार आहे. नागपूर, पुणे, जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार आहे.

नागपुरातही तीन ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे. डागा हॉस्पिटल, महापालिकेचं के टी नगर आरोग्य केंद्र आणि कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात याची तयारी पूर्ण झाली आहे. नियोजनबद्ध पद्धतीनं लसीकरण करता यावं, म्हणून हा ड्राय रन घेण्यात येतोय. तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 25 जणांची निवड करण्यात आलीये. प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागाची सुमारे आठ डॉक्टरांची टीम आणि इतर यंत्रणा सज्ज राहणार आहे. २ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाच्या लसीची रंगीत तालिम सुरू होणार आहे.