धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार
पुणे बातमी

धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार

राज्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या घटनां चिता व्यक्त होत असताना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ऑफिसमधून घरी जात असताना एका तरुणाने या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलत्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणारी हि तरुणी ऑफिसमधून सायकली घरी परतत असताना एका तरूणाने तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काही तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. गुरुवारी रात्री ऑफिसचे काम आटोपून ती घरी जात होती. त्यावेळी एका तरूणाने तिचा पाठलाग करत तिला गाठले आणि तिला मारहाणही केली. नंतर जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसववून खराडीतील एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे तरुणीवर आरोपीनं बलात्कार केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्या तरुणीला येरवडा येथील गुंजन चौकात आणून सोडले.

या घटनेनं तरुणी हादरून गेली होती. त्याच अवस्थेत तरुणीने तत्काळ घडलेली घटना मित्राला फोन करून सांगितली. त्या दोघांनी पोलिसात तक्रार दिली. घटना घडलेल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी करून आरोपीची ओळख पटली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला काही तासातच बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीसोबतच तीन नराधमांनी क्रूर कृत्य केलं होतं. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचं २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता अपहरण करण्यात आलं होतं. वडगाव शेरी परिसरातून मुलीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला होता.