मोठी बातमी : जगाच्या तुलनेत भारताचा कोरोना रिकव्हरी रेट सर्वाधिक
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : जगाच्या तुलनेत भारताचा कोरोना रिकव्हरी रेट सर्वाधिक

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी झाला असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. जगातील काही देशांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. पंरतु तुलनेने या सर्वांमध्ये भारताचे मृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात कमी असून जगाच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट हा सार्वाधिक आहे. ही माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, केंद्रासोबतच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता तसेच आखले गेलेले कडक निकष याचा परिणाम भारतात सातत्याने कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत राहिला तर वेगाने कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट आणि मृत्यूदर कमी होण्यात झाला.

जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा ७०.२७ टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या देशांचा रिकव्हरी रेट भारतापेक्षा कमी आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.