शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…
मनोरंजन

शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वारंवार गर्भपात व्हायचा. यामुळे ती मोठ्या प्रमाणात खचली होती. एका आजारामुळे तिला वारंवार गर्भपाताला सामोरं जावं लागलं होतं. व्यवसायिक राज कुंद्रासोबत लग्न केल्यानंतर २०१२ मध्ये शिल्पा शेट्टीने मुलगा विहानला जन्म दिला. विहानच्या जन्मानंतर शिल्पा शेट्टीला अजून एक मूल हवं होतं. २०१३ ते २०१९ दरम्यान शिल्पा शेट्टी अनेकदा गर्भवती राहिली, पण नेहमी तिला गर्भपाताला सामोरं जावं लागलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑटो इम्यून कंडिशनमुळे APLA जेव्हा जेव्हा शिल्पा गर्भवती राहत होती तेव्हा गर्भपात होत होता. वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळे शिल्पा खचली होती. अनेकदा तिने आपलं हे दुख: सर्वांसमोर बोलूनही दाखवलं आहे. अखेर हार पत्करत शिल्पाने सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचं ठरवलं. १५ फेब्रुवारी २०२० ला शिल्पा शेट्टीने सरोगसीच्या माध्यमातून एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि ती तणावातू मुक्त झाली.

दरम्यान, आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या पन्नाशीजवळ पोहोचलेली शिल्पा आजही एकदम फिट आणि स्लिम आहे. आपल्या फिटनेसने शिल्पा अनेक महिलांना प्रेरणा देते. सर्वांना आपल्या फिटनेसने आश्चर्यचकित करणाऱ्या शिल्पा शेट्टीला मात्र मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.