डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांचे निधन; घरामध्ये सापडले होते रक्ताच्या थारोळ्यात
बातमी मुंबई

डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांचे निधन; घरामध्ये सापडले होते रक्ताच्या थारोळ्यात

डहाणू : डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे (४१) यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (ता. २९) सकाळी १० वाजता निधन पावले. २६ मार्च रोजी सकाळी पिंपळे त्यांच्या डहाणू मल्याण येथील घरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना डहाणू व्हेस्टकोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने तसेच डायलेसिस करण्यासाठी सोमवारी त्यांना हिंदूजा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पालघर तालुक्यातील मासवण या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

डहाणू नगर परिषद येथे दुसऱ्यांदा मुख्याधिकारी पदाचा पदभार ते सांभाळत होते. कोरोना काळात डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात त्यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली होती. पिंपळे हे चांगल्या कारभाराबरोबरच प्रशासनावर वचक निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते.