दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन
बातमी मुंबई

दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन

दैनिक वृत्तरत्न सम्राट पेपरच्या माध्यमातून फुले,शाहु,आंबेडकर यांची चळवळ घराघरात पोहचविणारे दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक बबन कांबळे यांचं निधन झाले आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सडेतोड पत्रकार, विद्वान संपादक, बहुजन चळवळीचा मार्गदर्शक हरपला अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिवंगत बबन कांबळे यांनी यापूर्वी दैनिक नवाकाळ मध्ये वरिष्ठ संपादक या पदावर काम पाहिले होते. सडेतोड पत्रकारितेमध्ये त्यांचा राज्यात हातखंडा होता नवाकाळ मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलेल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट 2003 साली काढून राज्यातील आंबेडकरी समाजाला दिशा देण्याचे काम केले. दैनिक सम्राटचे अंक वाचण्यासाठी लोक वाट पाहायचे.

दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या माध्यमातून दिवंगत बबन कांबळे यांनी राज्यात अनेक पत्रकार,लेखक,कवी यांना आपल्या पेपरच्या माध्यमातून लिहण्याची संधी दिली. राज्यातील गावागावात – शहराशहरात होणाऱ्या अन्याय – अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले. दैनिक वृत्तरत्न सम्राटचा अग्रलेख वाचनीय असायचे. आपल्या पेपरच्या माध्यमातून त्यांनी फुले,शाहु,आंबेडकरी चळवळीला गतिमान करून अनेक शोषित,वंचित समूहातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. आज सकाळी बबन कांबळे यांचे दुःखद निधन झाल्याने समाजातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.