National Sikh Day: १४ एप्रिल रोजी ‘राष्ट्रीय शीख दिन’ म्हणून साजरा केला जावा यासाठी अमेरिकेत प्रस्ताव सादर
बातमी

National Sikh Day: १४ एप्रिल रोजी ‘राष्ट्रीय शीख दिन’ म्हणून साजरा केला जावा यासाठी अमेरिकेत प्रस्ताव सादर

National Sikh Day: मूळ भारतीय असलेले अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्यासहीत १२ हून अधिक खासदारांनी अमेरिका देशात १४ एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय शीख दिन’ (National Sikh Day) म्हणून घोषित केला जावा, यासाठी मागणी केली आहे. याचसंबंधी या सर्व खासदारांकडून प्रतिनिधी सभेत एक प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संबंधित प्रस्तावात, अमेरिकेच्या विकासात शीख समुदायाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उल्ल्लेख करतानाच या समुदायाच्या भूमिकेप्रती सन्मान प्रदर्शित करण्यासाठी ‘राष्ट्रीय शीख दिना’ची घोषणा करण्याचं समर्थन देखील करण्यात आलं आहे.

२८ मार्च तारखेला सभागृहात मांडण्यात आलेल्या प्रस्तावाच्या प्रवर्तक खासदार मेरी गेल सॅनलोन आहेत. तसेच कॅरेन बास, पॉल टोन्को, ब्रायन के फिट्झपॅट्रिक, डॅनियल म्यूज, एरिक स्वालवेल, राजा कृष्णमूर्ती, डोनाल्ड नॉरक्रॉस, अँडी किम, जॉन गारामेंडी, रिचर्ड ई नील, ब्रेंडन एफ बॉयल आणि डेव्हिड जी वालाडाओ हे त्याचे सह-प्रस्तावक देखील आहेत. शीख कॉकस समिती, शीख समन्वय समिती आणि अमेरिकन शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (AGPC) यांच्याकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं आहे.