राहुल गांधीनंतर काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष राहिलेल्या वोरांचे निधन
देश बातमी

राहुल गांधीनंतर काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष राहिलेल्या वोरांचे निधन

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे आज(ता. २१) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मोतीलाल वोरा यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपालदेखील होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राहुल गांधी यांनी लोकसभेतील पराभावानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्यानंतर मोतीलाल वोरा हे यांना काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यातआली होती. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1928 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात झाला होता.

पंतप्रधान मोदींसह काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधानाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.