पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! मराठीसह ‘या’ पाच भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग
देश बातमी

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! मराठीसह ‘या’ पाच भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मराठीसह इतर पाच भाषांमध्ये शिकवला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला आणि महत्त्वाची माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं. इंजिनिअरिंग, कॉमर्स, सायन्स अशा मोठ्या आणि ज्ञानानं परिपूर्ण असलेल्या अभ्यासक्रमांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा हा यामागचा हेतू आहे. मात्र उच्च शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारचं भाषेचं बंधन असू नये. विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतूनही शिक्षण घेता यावं यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील राहिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

याचाच एक भाग म्हणून आता देशातील 8 राज्यांतील 14 अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये 5 भारतीय भाषांत म्हणजेच हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, आणि बांग्लामध्ये अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. अभियांत्रिकीच्या कोर्सचे 11 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी एक टूलही विकसित केलं आहे अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना स्वतःच्या भाषेत इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे.

त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा शिकता येणार आहे. तसंच ही भाषा शिकून ज्या विद्यार्थ्यांना ऐकू त्यात नाही किंवा बोलता येत नाही अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कामही करता येणार आहे. यासाठी डिजिटल टेक्स्टबुकही तयार कारण्यात आले आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटलच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे.