शिवसेनेचं ठरलं ! निवडणुका लढणार स्वबळावर
राजकारण

शिवसेनेचं ठरलं ! निवडणुका लढणार स्वबळावर

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशमध्ये येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना उत्तरप्रदेशमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा? असा सवालच संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला. उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवणार आहोत, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले आहेत. ममतांचं म्हणणं आहे की, आधी एकत्र यावं. नेता कोण असावं हे नंतर ठरवता येईल. तृणमूल पक्षाची बैठक असल्यानं त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, असं संजय राऊत यांनी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे.