वाढदिवसादिवशीच चार मित्राचा डोळ्यादेखत मृत्यू; पार्टी करुन परतताना अपघात
बातमी विदर्भ

वाढदिवसादिवशीच चार मित्राचा डोळ्यादेखत मृत्यू; पार्टी करुन परतताना अपघात

चंद्रपूर : वाढदिवसाची पार्टी करुन मित्र परततत असताना झालेल्याय अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. ज्या तरुणाचा वाढदिवस होता तो वाचला असून आपल्या मित्रांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागात मंगळवारी रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील आहेत.

योग गोगरी (२३) याचा मंगळवारी वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी दर्शना उधवाणी ( २५), प्रगती निमगडे (२४), मोहम्मद अमन (२३) आणि स्मित पटेल (२५) या चार मित्रांसह योग गोगरी हॉटेलमध्ये गेला होता. वाढदिवस साजरा करुन घऱी परतत असतानाच अजयपूर येथे त्यांचा कारचा भीषण अपघात झाला.

ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आल्याने भरधाव वेगात असलेली कार ट्रॅक्टरवर आदळली आणि हा अपघात झाला. अपघातानंतर तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांना बाहेर काढलं. मात्र यामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे.