नांदेडमध्ये कोरोनाचा कहर ! सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी रांगा
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर ! सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी रांगा

नांदेड : राज्यातील कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. अशातील मराठवाड्याती औरंगाबाद आणि नांदेड शहरात परिस्थिती भयानक बनल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या रुग्ण संख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच भयानक झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र दिसून येत असून साधारणतः स्माशनभूमीत १२-१२ तास वेटिंग करायला लागत आहे. नांदेडमधल्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत दिवसभरात 17 अत्यंविधीची नोंदणी झाली आहे. काल याच स्मशानभूमीत 20 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावरून नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती किती बिकट आहे याची कल्पना येते.

दरम्यान, नांदेडमध्ये काल ९७० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती, तर १४ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. नांदेड जिल्ह्यात ८ हजार ७१५ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील ९३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात ६९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.