मोहम्मद अझरुद्दीनचा राजस्थानमध्ये मेगा हायवेवर भीषण अपघात
देश बातमी

मोहम्मद अझरुद्दीनचा राजस्थानमध्ये मेगा हायवेवर भीषण अपघात

रायपूर : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची कार पलटी होऊन अपघात झाला आहे. राजस्थानातील सवाई माधेपूर येथे हा अपघात झाला आहे. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अझरुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अझरुद्दीन यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. तिथे ते ठीक असल्याचे समजताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि प्रथमोपचारानंतर त्याला सोडण्यात आले. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते. अझरुद्दीन यांना दुसऱ्या कारने हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.

२०१४ मध्ये त्यांनी टोंक-सवाई माधोपूर या मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. पण भाजपचे सुखबीरसिंग यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघाचे खासदारही होते. अझरुद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये ते या पदावर निवडून आले. अझरुद्दीन यांनी ४७ कसोटी आणि १७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. तीन विश्वचषकातही ते भारताचे प्रमुख होते. पण नंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्दीला ब्रेक लागला.