2 हजार रुपयांच्या नोटाबाबत आरबीआयचा मोठा निर्णय
देश बातमी

2 हजार रुपयांच्या नोटाबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारतात नोटाबंदी केल्यानंतर 2016 मध्ये चलनात 2 हजार रुपयांची नोट आणली होती. परंतु बनावट नोटा बाजारात येण्याचा धोका जास्त आहे. यामुळे आरबीआयने आता मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलन प्रणालीमधून लवकरच 2 हजारांच्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण, आता 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हळूहळू चलन प्रणालीमधून 2 हजार रुपयांच्या नोटा काढण्यास सुरूवात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

2021-2022 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे. मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.

आरबीआयच्या या रिपोर्टनुसार 2021 मध्ये कागदी नोटा 0.3 टक्के घटून 2,23,301 लाख युनिट आहेत. मूल्याचा विचार करता मार्च 2021 मध्ये 4.9 लाख कोटी रुपयांच्या 2000 नोटा चलनात होत्या. तर मार्च 2020 मध्ये यांचं 5.48 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. मार्च 2018 ते 2000 के सिस्टममध्ये 336.3 कोटी नोटा होत्या. मार्च 31, 2021 मध्ये यांची संख्या घटून 245.1 कोटींवर आली आहे. याचा अर्थ तीन वर्षांत 91.2 कोटी नोटा चलन व्यवस्थेतून बाहेर करण्यात आल्या आहेत.