मोठी बातमी ! ऑनलाईन रजिस्टर न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार लस
देश बातमी

मोठी बातमी ! ऑनलाईन रजिस्टर न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार लस

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत असताना 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लस घेता येत नव्हती. आता हा निर्णय बदलण्यात आला असून केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन ॲपवर cowin.gov.in केली जाईल. काही राज्यांमध्ये लोक ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुळं लस वाया जाण्याचीही शक्यता असते. तसेच ग्रामीण भागातील लोकांमध्ये अद्यापही ऑनलाईन नोंदणीविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळं नोंदणी होण्यात बऱ्याच अडचणी येतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळं दिवसाअखेरीस बर्‍याच वेळा उरलेली लस खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत सरकारने आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना जागेवर नोंदणी आणि लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते-ते संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहे की, त्यांना हा निर्णय लागू करायचा आहे की नाही.