Gautam Adani Row: गौतम अदानी यांच्या अडचणीत होणार आणखी वाढ, सिमेंट कारखाने, कंपन्यांवर धाड
देश बातमी

Gautam Adani Row: गौतम अदानी यांच्या अडचणीत होणार आणखी वाढ, सिमेंट कारखाने, कंपन्यांवर धाड

Gautam Adani Row: अमेरिकेतील हिंडनबर्गच्या अहवालामुळं अडचणीत आलेल्या उद्योगपती गौतम अदानी (Businessman Gautam Adani ) यांच्या मागे लागलेलं अडचणींचं सत्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आणि त्यातच सध्या हिमाचल प्रदेशात सुरु असणाऱ्या सिमेंट वादामध्ये आता अदानींच्या काही कारखाने, कंपन्यांवर धाड टाकण्याचं सत्र सुरु झालं आहे. बुधवारीच स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटकडून हिमाचलमधील अदानी विल्मर ग्रुपवर धाड टाकण्यात आली. दरम्यान, बुधवारी अदानींचे शेअर्स पडलेले असताना त्यामध्ये काहीशी उसळी पाहायला मिळाली. पण पुन्हा नुकसानाचं तेच चित्र पाहायला मिळालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानींनाही मागे टाकणाऱ्या गौतम अदानी यांना काही दिवसांतच मोठा फटका बसला आहे. यातूनच सावरत असताना आता हिमाचलमधील प्लांटवर पडलेली धाड त्यांच्या अडचणींमध्ये भर टाकणारी ठरत आहे.

जानेवारी महिन्यात हिंडनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी यांची आर्थिक डोंगर कोसळला आहे. कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यावर आर्थिक घोळ केल्याचा आरोप हिंडनबर्गच्या अहवालातून करण्यात आला. त्यांनतर अदानी यांच्या कंपनीच्या शेअरची घसरण पाहायला मिळाली. आणि यातच अदानीच्या कंपनीकडून २० हजार एफपीओ रद्द करण्याचा देखील मोठा निर्णय घेतला आहे.

तर बुधवारी त्यांच्या परिस्थितीत हलकीशी सुधारणा दिसून आली होती. जिथं अदानी एंटरप्रायजेसचे शेअर 2,158.65 रुपये इतक्या दरावर बंद झाले. आणि साधारण 19.76 टक्क्यांची वाढ झाली होती. ज्यामुळं अदानींचं मार्केट कॅपिटलायझेशन 40,601.14 रुपयांनी वाढून 2.46 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.