कसबा पोटनिवडणुकीत राहुल गांधींची एंट्री; एका फोनवर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराची माघार
राजकारण

कसबा पोटनिवडणुकीत राहुल गांधींची एंट्री; एका फोनवर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराची माघार

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठीकडून कालपासून दाभेकर यांची मनधरणी करत होते. आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतल्याचे दाभेकर यांनी सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या ४० वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे आणि पक्षाने उमेदवारी देण्यासाठी पक्षाकडे दाभेकर यांनी आपली उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता.

काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दाभेकर यांची मनधरणी सुरू होती.पण ते अपक्ष लढण्यावर ठाम होते आणि काल रात्री काँग्रसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आल्याने दाभेकर यांनी आपल उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गेल्या ४० वर्षापासून पक्षासाठी काम करत आहे आणि जेव्हा आम्ही पोट निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे बंड पुकारले होते. पण एका कार्यकर्त्याला जेव्हा राहुल गांधी यांचा फोन येतो, ही खूप गर्वाची बाब असून म्हणून मी माझं उमेदवारी अर्ज आज मागे घेतल्याचे दाभेकर म्हणाले.