सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण; कारण…
देश बातमी

सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण; कारण…

नवी दिल्ली : सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अचानक सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२८६ रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. याच कारण म्हणजे अर्थमंत्र्यांनी सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात २.५ टक्क्यांनी घट करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे सोन्याच्या दारात मोठी घसरण झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. मात्र अर्थसंकल्पीय भाषण संपताच मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचा भाव १,२८६ रुपयांच्या घसरणीसह ४८,१२३ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. एक किलोग्रम चांदीचा भाव सध्या ७२,८७० रुपये इतका झाला आहे.

MCX वेबसाइटच्या माहितीनुसार, अर्थसंकल्प सादर होण्याआधी सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. फेब्रुवारीच्या सोन्याच्या दरात २७४ रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. सकाळी ९.०५ मिनिटांनी १८५ रुपयांच्या वाढीसह सोन्याचा भाव ४९,२८१ रुपये इतका होता. तर चांदीचा दरही १९४४ रुपयांच्या वाढीसह ७१,६५० रुपये इतका नोंदविण्यात आला होता.

सध्या सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी १२.५ टक्के इतकी आहे. याशिवाय त्यावर ३ टक्के जीएसटी देखील आकारला जातो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचा दरात कमालीची घसरण झाली. पण सध्या सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त असल्याचं एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितलं.