माळशेज घाटात धोकादायक वळणावर पलटली बस; 2 ठार, 18 जखमी
पुणे बातमी

माळशेज घाटात धोकादायक वळणावर पलटली बस; 2 ठार, 18 जखमी

जुन्नर : पुणे जिल्ह्यात नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात एका धोकादायक वळणावर खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तब्बल 18 जण जखमी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सायंकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली. नगरहून कल्याणकडे जाणारी बस क्रमांक MH-46 AH-0109 धोकादायक वळणावर पलटी झाली. अपघाताची बातमी समजताच परिसरातील सर्व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना आळेफाटा व मुरबाड या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काहीकाळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अनेकजण जखमी असल्याने ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे. अनेक दिवसांपासून माळशेज घाटात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे जिकरीचे होत आहे. संत निरंकारी मिशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात नेणं शक्य झालं आहे.