हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या मोठा मुलगा ब्रिजमोहन यांचे निधन
देश बातमी

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या मोठा मुलगा ब्रिजमोहन यांचे निधन

नवी दिल्ली : हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजेच ब्रिजमोहन सिंग यांचे सोमवारी निधन झाले. त्यांचा धाकटा भाऊ आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार अशोक कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांचे वय ८२ वर्ष होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ब्रिजमोहन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते राजस्थान क्रीडा परिषदेचे सेवानिवृत्त प्रादेशिक क्रीडा अधिकारी होते. अशोक यांनी आयएएनएसला सांगितले, माझे बंधू एका महिन्यापूर्वी कोरोनातून सावरले होते. त्यांची प्रकृती ठीक होती. त्यांना इंग्रजी चित्रपट पाहण्याची आवड होती आणि ते काल रात्री पाहत होते. ते मॉर्निंग वॉकलाही गेले होते. परत आल्यानंतर त्यानी बाथरूममध्येच प्राण सोडले. ब्रिजमोहन हे मेजर ध्यानचंद यांच्या सात मुलांमध्ये सर्वात मोठे होते.