चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधानांना कोरोनाची लागण
बातमी विदेश

चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधानांना कोरोनाची लागण

लाहोर : चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियम आणि समन्वय विभागासाठी इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक म्हणून काम करणारे फैजल सुल्तान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. इम्रान खान यांनी चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१८ मार्चला इम्रान खान यांनी चिनी कोरोना प्रतिबंधक लस सिनोफार्म (Sinopharm) लसीचा डोस घेतला होता. पाकिस्तानमध्ये सध्या फक्त ही एकमेव लस उपलब्ध आहे. या लसीचे दोन डोस घेणं अनिवार्य आहे.

चीनने १ फेब्रुवारीला पाकिस्तानला सिनोफार्म लसीटे पाच लाख डोस दिले होते. यानंतर पाकिस्तानमध्ये लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. १७ मार्चला चीनकडून दुसऱ्या टप्प्यातील लसींच्या डोसचा साठा पाठवण्यात आल्यानंतर इम्रान खान यांनी लस टोचून घेतली होती.