धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग
इतर

धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच महिलेने गुप्तांग कापल्याचा प्रकार घडला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा महिलेचा पती घराबाहेर होता. आरोपी घरात घुसला तेव्हा महिला आणि तिचा १३ वर्षांचा मुलगा घऱात होते. चोर समजून मुलगा भीतीने घरातून बाहेर पळून गेला. मात्र यावेळी आरोपीने महिलेला मारहाण करत लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. जवळपास २० मिनिटं महिला विरोध करत होती. अशातच आत्मसंरक्षण करताना महिलेने तिथे खाटेखाली पडलेला कोयता उचलला आणि आरोपीचं गुप्तांग कापलं.

या घटनेनंतर महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली हकीकत सांगितली. महिलेने सांगितलेल्या घटना क्रमानुसार पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली तर संबधित आरोपीला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपीनेदेखील तक्रार केली असल्याने महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.