सलग तिसऱ्या दिवशी देशात आढळले ५० हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सलग तिसऱ्या दिवशी देशात आढळले ५० हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी नव्याने आढळलेल्या डेल्टा प्लस कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे धोका वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी देशात ५४ हजार ६९ कोरोना बाधित आढळले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात मागील २४ तासांत ६४ हजार ५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.३० टक्के आहे, तर रिकवरी रेट ९६ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय प्रकरणे सुमारे २ टक्के आहेत. कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण संख्येच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगात अमेरीका, ब्राझीलनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

आतापर्यंत भारतात तीन कोटी ३ लाख ३४ हजार ४४५ रुग्ण आढळले. यापैकी दोन कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.