देशात कोरोनाचा कहर ! २४ तासांता १ लाख ६० हजारांहून अधिक रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचा कहर ! २४ तासांता १ लाख ६० हजारांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नसून कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत भारत आता जगाच्या यादीत पुन्हा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार ७३६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा अॅक्टिव्ह रुग्णांचा हा उच्चांकी आकडा आहे. देशात आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.

कोविड निर्बंधांचे पालन लोक कमी प्रमाणात करीत आहेत, त्याशिवाय कोविडच्या जास्त संसर्गजन्य विषाणूचे प्रकार भारतातही आले आहेत, यामुळे सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे, असं मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. सध्या देशात करोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांची संख्या काही राज्यात वेगाने वाढताना दिसत आहे.