देशात कोरोनाचे तांडव; एका दिवसात जगातील सर्वात जास्त रुग्णसंख्या आणि मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचे तांडव; एका दिवसात जगातील सर्वात जास्त रुग्णसंख्या आणि मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे अक्षरशः तांडव सुरु असून काल (ता. २०) २४ तासांत जगातील सर्वाधिक रुग्णांची आणि मृत्यूची नोंद भारतात झाली आहे. मंगळवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर मृतांच्या आकड्यानंही उच्चांक गाठला आहे. मंगळवारी चोवीस तासात तब्बल 2 लाख 94 हजार 115 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, 2020 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत नोंदवली गेलेली ही सर्वाधिक संख्या आहे. पहिल्यांदाच देशात 2 हजारहून अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील सलग पाच दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात मोठी वाढ नोंदवली जात आहे. आता कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 1 लाख 82 हजार 570 इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 1 कोटी 56 लाक 09 हजार 004 झाली आहे. देशात सध्या 21 लाख 50 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधितांची बरं होण्याचा दर घटून 85 टक्क्यांवर आला आहे. देशपातळीवर कोरोनाच्या मृत्यूदरात घट होऊन तो 1.20 टक्के झाला आहे. तर, महाराष्ट्रात मात्र हा दर 1.5 आणि पश्चिम बंगालमध्ये 1.6 टक्के इतका आहे. देशात मागील चोवीस तासात सर्वाधिक 519 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यानंतर दिल्लीमध्ये 277, छत्तीसगड 191, उत्तरप्रदेश 162, गुजरात 121, कर्नाटक 149, पंजाब 60 , मध्य प्रदेश 77 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. या आठ राज्यांमध्येच जवळपास 1556 जणांचा मृत्यू झाला आहे.