लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रांचीत उपचार सुरु
देश बातमी

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रांचीत उपचार सुरु

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांनी रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती खालावल्यानंतर लालूप्रसाद यांची मुलगी मिसा भारती रुग्णालयात पोहोचली आहे. लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी चार्टर्ड विमानाने पाटणा येथून रांचीसाठी निघाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रुग्णालयाचे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लालूप्रसाद यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. आम्ही एम्स रुग्णालयाच्या संपर्कात आहोत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आरटी-पीसीआर रिपोर्ट उद्या येईल, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अजून काही चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही सांगू शकू. मी, माझा भाऊ आणि आई रांचीला जात आहोत, असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, प्रकृती बिघडल्यानंतर गुरुवारी लालूप्रसाद यादव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बऱ्याच दिवसांपासून लालूप्रसाद यादव यांना अनेक व्याधींचा त्रास होत आहे.