देशात रुग्णवाढीला ब्रेक; पण मृत्यूचं थैमान सुरूच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात रुग्णवाढीला ब्रेक; पण मृत्यूचं थैमान सुरूच

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. परंतु मृत्यूचं थैमान सुरुच आहे. दररोज होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोमवारी दिवसभरात देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंचं प्रमाण मात्र काळजी वाढवणारं आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन लाख २९ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५६ हजार ८२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

देशात रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस देशात दिवसाला चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती. हा आकडा काही प्रमाणात कमी झाला असला, तरी सरासरी कायम आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या दोन लाख ४९ हजार ९९२ वर पोहोचली आहे.