नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी देशात मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी देशात मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा मागील २४ तासांच्या तुलनेत काहीसा कमी झाला असला तरी मृत्यूचा आकडा वाढला असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे तांडव सुरुच आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात दीड हजारांहून अधिक कोरोनाबळीची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५९ हजार १७० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. तर दुसरीकडे १ लाख ५४ हजार ७६१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत असलं, तरी काळजीची बाब म्हणजे देशात दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ हजार ७६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात रविवारी २ लाख ७३ हजार ८१० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यात सोमवारी घट झाली आहे. मात्र, मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. रविवारी १,६१९ जणांचा मृत्यू झाला होता. १ हजार ७६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकाच दिवसात मृत्यूचा आकडा शंभरपेक्षा अधिक वाढला आहे.