जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच करणार जाहीर
देश बातमी

जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच करणार जाहीर

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द वा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याकडे राज्य सरकारांसह केंद्राचा कल दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता जेईई मेनची परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फेब्रवारी आणि मार्चमध्ये पहिले दोन सत्रातील परीक्षा पूर्ण झालेल्या असून, एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २७, २८ आणि ३० एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. परीक्षेसाठी सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या १५ दिवस आधी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हटलं आहे.