देशातील झोप उडविणारी आकडेवारी; २४ तासांत १ हजारापेक्षा जास्त मृत्यू; तर…
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील झोप उडविणारी आकडेवारी; २४ तासांत १ हजारापेक्षा जास्त मृत्यू; तर…

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव हा पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तीव्र आहे. दररोज नवनवे उच्चांक नोंदवले जात असून, देशात मंगळवारी झोप उडविणारी आकडेवारी समोर आली आहे. तर गेल्या २४ तासांत देशात १ हजारपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात कोरोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० ते १३ हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारीपासून हे चित्र बदललं असून, अवघ्या दोन महिन्यातच पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे आता दररोज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली जात आहे.

केंद्रानं जाहीर केलेली ही आकडेवारी भयावह आहे. देशात २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८२ हजार ३३९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८५ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्ण उपचार घेत आहेत.