कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातून दिलासादायक आकडेवारी! नव्या रुग्णांच्या आकड्यांत मोठी घट

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता कमी होताना दिसत असून मागील २४ तासांत राज्यातून दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात दिवसभरात १४ हजार ४३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, १२ हजार ५५७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, २३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५५ लाख ४३ हजार २६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६५ लाख ०८ हजार ९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ३१ हजार ७८१ (१५.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ४६ हजार ३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ कोटी ८५ लाख ५२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *