कोरोनाची दुसरी लाट : ब्रिटनच्या 40 टक्के डॉक्टरांना मानसिक आजार
विदेश

कोरोनाची दुसरी लाट : ब्रिटनच्या 40 टक्के डॉक्टरांना मानसिक आजार

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर तान वाढला आहे. तर काही देशांमध्ये अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र ब्रिटनमधून दुसऱ्याचे लाटेचे परिणाम डॉक्टरांवर दिसून आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना विषाणू साथीच्या नवीन तेजीचा परिणाम डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर झाला आहे. एकट्या अमेरिकेतील दोन लाख १८ हजार ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना या विषाणूची बाधा झाली आहे. किमान ८०० लोक मरण पावले आहेत.

साथीच्या आजाराने बाधित सर्व देशांमध्ये अशीच परिस्थिती आहे. ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या ऑक्टोबरमधील सर्व्हेनुसार, यूकेमधील ४०% पेक्षा जास्त डॉक्टर मानसिक समस्येच्या आजाराशी झुंजत आहेत. विषाणूची नवी लाट आरोग्य कर्मचाऱ्यांवर भारी पडू शकते, असंही दिसत आहे.

दरम्यान वॉशिंग्टन राज्यात मागील नऊ महिन्यांत आरोग्य कर्मचाऱ्याच्या कामाचे तास वाढले आहेत. घरातील काम आणि मुलांच्या संगोपनामुळे मोठ्या संख्येने येथील महिला कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचे समोर आले आहे.