आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार, कसं ते जाणून घ्या
देश बातमी

आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार, कसं ते जाणून घ्या

यावर्षीच्या IPL 2023 च्या सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा द्वारे ऑनलाइन केले जात आहे. याचा अर्थ, Jio वापरकर्ते IPL सामने सबस्क्रिप्शनशिवाय पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात. परंतु, आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका सामन्यासाठी खर्च करावे लागणार २८ रुपये
इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, आयपीएलचा कोणताही सामना ३ तास पर्यंत चालतो. मोबाइल अॅपवर सामना पाहण्यासाठी यूजर्सला कमीत कमी २ जीबी डेटाची गरज पडू शकते. भारतात जगातील सर्वात स्वस्त डेटा मिळतो, असे म्हटले जाते. परंतु, याची किंमत जवळपास १४ रुपये प्रति जीबी आहे. याचाच अर्थ जिओ अॅपवर क्रिकेट सामना पाहण्यासाठी जिओ यूजर्सला २८ रुपये खर्च करावे लागतील.

आयपीएलमध्ये एकूण ७० मॅच आहेत. चार प्लेऑफ मॅच ५२ दिवसात खेळवल्या जाणार आहेत. मोबाइल किंवा कनेक्टेड टीव्हीवर ७४ मॅच पाहण्यासाठी २ हजार ०७२ रुपयाच्या डेटाची गरज यूजर्सला लागणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या लेटेस्ट ग्राहक डेटा नुसार, रिलायन्स जिओच्या सक्रीय ग्राहकांची सध्याची संख्या ४२५ मिलियन आहे. या अॅपच्या हिशोबानुसार, यातील मिलियन मधील ग्राहक एक सामना जरी पाहत असतील तर त्यावर ११ हजार ९०० मिलियन रुपये खर्च करावे लागतील. मीडिया नेटवर्क आपल्या फ्री आयपीएलच्या माध्यमातून ५०० मिलियन यूजर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.