अमेरिकेचा मोठा निर्णय; १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस
बातमी विदेश

अमेरिकेचा मोठा निर्णय; १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमूमीवर कोरोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबत घोषणा केली. १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस घेता येईल असं बायडेन यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेने यापूर्वी १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी जो बायडेन यांनी याबाबत नवीन घोषणा करून १ मे ऐवजी १९ एप्रिलपासूनच १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला, असं सांगितलं आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, भारतातही वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. कोरोनाची लस 18 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना खुली करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) केली आहे. यासंदर्भात असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.