राज्यात आज ६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज ६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई : आज राज्यात ६ हजार ६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज राज्यात ५ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचबरोबर राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ % एवढे झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसरीकडे गेल्या २४ तासात राज्यात १५८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ७६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ६७६ व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाईनमध्येआहेत. राज्यात ६३ हजार ४ रुग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रात ४ कोटी ७९ लाख ३८ हजार २५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी १ लाख८३ हजार ५०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.