MHT CETसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु; असा करा अर्ज
बातमी महाराष्ट्र

MHT CETसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु; असा करा अर्ज

मुंबई : MHT CET २०२१ साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी ८ जूनपासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ७ जूलैपर्यंत अर्ज करु शकतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी, फार्माकोलॉजी किंवा अ‍ॅग्रीकल्चर एज्युकेशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट mahacet.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एमएचटी सीईटी २०२१ च्या ऑनलाईन नोंदणी आणि अर्जाच्या शेवटच्या तारखेची घोषणा केली.

इंजीनियरिंग आणि टेक्नॉलॉजी, फार्मेसी, आणि फार्म डी डिग्री कोर्सेस पहिल्या वर्षामध्ये प्रवेश करण्यासाठी एमएचटी सीईटी अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डवर आधारित असेल.