काव्याने घडवला इतिहास! जेईई मेन परिक्षेत पहिल्यांदाच अशी कामगिरी
देश बातमी

काव्याने घडवला इतिहास! जेईई मेन परिक्षेत पहिल्यांदाच अशी कामगिरी

नवी दिल्ली : दिल्लीच्या काव्या चोप्राने इतिहास घडवला आहे. काव्याने जेईई (Joint Entrance Examination) मुख्य 2021 मध्ये केवळ शंभर टक्के गुण मिळवले नाहीत तर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 300 पैकी 300 गुण मिळविणारी ती पहिली महिला विद्यार्थी ठरली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काव्याने फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या परीक्षेत 99.9 टक्के गुण मिळवले होते, त्यात सुधारणा करत आता तिला 100 टक्के गुण मिळाले आहेत. ती आता आयआयटी प्रवेश परीक्षा- JEE Advanced 2021ची तयारी करत आहे. काव्या तिच्या 99.9 टक्के गुणांवर नाखूश होती. तिच्या 99.9 टक्के गुणांच्या आधारेही ती जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरली असती. पण ती यावर समाधानी नव्हती आणि तिला असा विश्वास होता की आणखी चांगली कामगिरी तिला करता येईल.

काव्याचे आता आयआयटी-दिल्ली (IIT-Delhi) किंवा आयआयटी-बॉम्बेमधून (IIT Bombay) संगणक शास्त्राचा अभ्यास करण्याची शक्यता आहे. तसे तिचे स्वप्न आहे. काव्याला नेहमीच बरोबरीच्या संधी मिळाल्या पण भारतातील मुलींना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते याची तिला कल्पना आहे. ‘मला आणि माझ्या भावाला माझ्या पालकांनी बरोबरीची वागणूक दिली. माझ्या लिंगानुसार वैयक्तिकरित्या माझ्याशी कधीही भेदभाव केला नाही पण मला ठाऊक आहे की भारतातील बर्‍याच मुलींना इतका विशेषाधिकार दिला जात नाही. जरी माझ्याशी कधीही भेदभाव केला गेला नाही, तरीही इतर मुली कोणत्या परिस्थितीतून जातात हे मला माहिती आहे.’ अशी प्रतिक्रीया काव्याने निकालानंतर दिली आहे.