मोठा दिलासा; राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठा दिलासा; राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव दिसत होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताना दिसत असून आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज १० हजार ८१२ कोरोना रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९५.९९ टक्के इतकं आहे. तर आज ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे राज्यात आज १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १७ हजार ८७४ रुग्ण सक्रिय आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचरोबर देशातील आकडेवारीही कमी होताना दिसत आहे. रविवारी देशात ४६ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात आणखी एक मोठा दिलासा म्हणजे कोरोनामुळे होत असल्येल्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तीन महिन्यांनंतर मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.

गेल्या २४ तासांत अर्थात रविवारी देशात ४६ हजार १४८ नवी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.