सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…
देश बातमी

सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…

पणजी : नाताळाचा सणाला काहीच दिवस उरले आहेत. अशातच गोव्यात नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू अचानक याच दिवसांमध्ये गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवत आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असेही प्रमोद सावंत यांनी म्हंटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर गोमांसाची मागणी वाढलेली आहे. खरे तर कर्नाटकात गोमांसाची कमतरता निर्माण झाल्यामुळे गोव्यात देखील गोमांसाचा तुडवडा जाणवत असल्याची माहिती मांस विक्रेत्यांनी दिली आहे. त्यामुळे ऐन सण, उत्सव आणि नव्या वर्षाच्या आगमनाच्या दिवसांमध्ये गोमांसाचा तुटवडा असल्याची जाणीव गोवा सरकारला असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

सण- उत्सवाच्याच दिवसांमध्ये गोव्यात जाणवणाऱ्या बीफस तुटवड्याची सरकारलाही कल्पना असून, यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून लवकरच मार्ग शोधू. तसेच, राज्यात बीफस उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर, या संदर्भात आपण पशुपालन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा तुटवडा भरून काढण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही सावंत यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार चर्चिल अल्मेडो यांनी राज्यात गोवा मीट कॉम्प्लेक्स लिमिटेडमध्ये पुन्हा कत्तलखाना सुरू करण्याची मागणी केलेली आहे. गोवा मीट कॉम्प्लेक्स लिमिटेडमध्ये कत्तलखाना गेल्या ५ वर्षांपासून बंद आहे. या ठिकाणी मांसाच्या विक्रीसाठी एका दिवसाला २०० जनावरे मारण्याची व्यवस्था आहे, असे अल्मेडो म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या गोवा राज्यात कत्तलखान्यातील कसायांवर प्रतिबंध लावण्यात आला. मात्र, कत्तलखान्यांना काही प्रमाणात बैल आणि म्हशी मारण्याची परवानगी देण्यात आली होती. शुक्रवारी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याची विनंती करणार असल्याचे अल्मेडो यांनी सांगितले.