दिलासादायक! कोरोनाची दैनंदिन रुग्णांची संख्या घटली, मृत्यूतही घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! कोरोनाची दैनंदिन रुग्णांची संख्या घटली, मृत्यूतही घट

मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून दैनंदिन मृत्यूंमध्ये देखील घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार ६१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ३४ हजार ३८९ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून असून हा फरक ७ हजार ७७३ इतका आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, आज एकूण ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५९ हजार ३१८ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील खाली घसरली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ४५ हजार ४९५ वर आली आहे.

आज राज्यात एकूण ५१६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ९७४ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४८ लाख ७४ हजार ५८२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे.